रामटेक: अंबाळा( रामटेक) परिसरात बिबटच्या झडपेत कुत्र्याचं पिल्लू जखमी ; सावधतेचा इशारा
Ramtek, Nagpur | Sep 13, 2026 रामटेक शहरा लगत रामगिरी पहाडीच्या पायथ्याशी जंगलाला लागून असलेल्या अंबाळा वस्तीत बिबट शिरल्याने अंबाळा वासियांत प्रचंड दहशत आहे.रविवार दिनांक 13 सप्टेंबरच्या पहाटे बिबटने झडप घालून मंदा कैलास उईके यांच्या घरासमोर एका कुत्र्याच्या पिल्लाला लक्ष करीत त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. अधिक निरीक्षण केले असता या परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे अर्थात पगमार्क दिसून आले आहेत.