जाफराबाद: जोमाळा येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 30 सप्टेंबर 2026वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद या विधानसभा मतदारसंघातील जोमाळा या गावांमध्ये भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी सांत्वन पर भेट दिली आहे तीन दिवसापूर्वी विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झालेले ट्रक ड्रायव्हर वाजिद शेख यांच्या घरी ही भेट देण्यात आली असून या शेक परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी माजी आमदार दानवे हे आले होते,पदाधिकारी गावकरी उपस्थित होते.