नरखेड: जलालखेडा पोलिसांची कारवाई: विनापरवाना देशी दारू वाहतूक करणारा आरोपी जाळ्यात, २ लाखांचा मुद्देमाल जप्त
मौजा देवग्राम ता. नरखेड येथे ३१ सीएन ४५३२ क्रमांकाच्या वॅगन आर कारमधून विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे: प्रविण उत्तमराव सोनुले याला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीकडून २१ निपा देशी दारू (किंमत ८४० रुपये) आणि वॅगन आर कार (किंमत २,००,००० रुपये), असा एकूण २,००,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन्वये गुन्हा नोंद करण्यात आला अजून पुढील तपास सुरू आहे