कळमेश्वर: गोंडखैरी येथे भीषण अपघात; अज्ञात कंटेनरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू
24 सप्टेंबर कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर–अमरावती महामार्गावर गोंडखैरी येथे भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात रस्ता ओलांडत असलेल्या एका कामगाराचा अज्ञात ट्रक-कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. मृतकाची ओळख गणेश तिलकचंद कुंभलवार वय 47 (रा. दोराकेसा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) अशी झाली आहे. गणेश कुंभलवार हे गोंडखैरी येथील संजय कंपनीमध्ये कार्यरत होते.