नागपूर शहर: पारडी पोलिसांची कारवाई: ३७४ ग्रॅम गांजासह एक जण अटकेत: नंदा मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 11 सप्टेंबरला सकाळी 10 दहा वाजता दिलेल्या माहितीनुसार,पारडी पोलिसांनी भवानी नगर येथील २१ वर्षीय सागर उर्फ गब्बर याला अटक केली असून, त्याच्याकडून १५,००० रुपये किमतीचा ३७४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आरोपी हा ओडिशातून गांजा आणत असल्याची माहिती तपासात समोर आली असून, पोलिस या तस्करीच्या इतर लिंक्सचा कसून शोध घेत आहेत.