*अमित शाहांच्या हस्ते अजित पवारांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण; पुण्यात दिग्गज नेत्यांची मांदियाळी!*
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष पुण्याकडे लागले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या अर्धपुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे नियोजन आहे.
यावेळी अजित पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेणारे छायाचित्र दालन, माहितीपट आणि कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन होणार आहे. पुणे जिल्ह्याच्या विकासातील अजित पवार यांच्या योगदानाच्या आठवणी जपण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. अमित शाह यांच्या या दौऱ्यामुळ
Pune City, Pune | Nov 16, 2026