*ऐन दुष्काळात ५० लाखांचा खर्च? मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यक्रमावर आम आदमी पार्टीची टीका!*
पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनावरून आम आदमी पार्टीने भाजपवर टीका केली आहे. ऐन दुष्काळाच्या परिस्थितीत या कार्यक्रमासाठी ५० लाख रुपये खर्च करण्याची गरज काय, असा सवाल आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी उपस्थित केला आहे.
भाजपला इव्हेंट आणि प्रसिद्धीची नशा चढली असल्याची टीका करत पुणेकरांच्या पैशांतून एवढा मोठा खर्च करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या कथित ५० लाखांच्या खर्चावरून पुण्यात राजकीय चर्चा सुरू झाली आहे. कार्यक्रमाचा नेमका खर्च, त्यासाठी वापरण्यात आलेला निधी आणि या आरोपांवर भाजपची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.
Murlidhar Mohol News, AAP Pune, Mukund Kirdat, BJP Event Controversy, 50 Lakh Event Expense, Pune Political News, Aam Aadmi Party Criticism, Pune News Today, Maharashtra Politics, Murlidhar Mohol Event, मुकुंद किर्दत, मुरलीधर मोहोळ, आपची भाजपवर टीका, ५० लाखांचा ख�
Pune City, Pune | Nov 16, 2026