महाराष्ट्रातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांसाठी १.६६ लाख कोटींच्या मदत पॅकेजची मागणी!
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यातील ३५८ पैकी ३०४ तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, ३७ हजार ४९६ गावांमधील खरीप पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार सुमारे १ कोटी ४१ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या परिस्थितीत राज्य सरकारने केंद्राकडे सुमारे ३१ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यासाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दुष्काळ सामूहिक गटाने शेतकऱ्यांसाठी तब्बल १ लाख ६६ हजार कोटी रुपयांच्या व्यापक मदत पॅकेजची मागणी केली आहे. यामध
Pune City, Pune | Nov 16, 2026