*चीनचे पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रवासी विमान हवेत झेपावले; विमान वाहतुकीत नवे पर्व सुरू होणार?*
विमान वाहतुकीच्या क्षेत्रात चीनने नवे पाऊल टाकले आहे. चीनच्या COMAC कंपनीने विकसित केलेल्या CE-25A या पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रवासी विमानाने १४ नोव्हेंबर रोजी पहिले मानवी चाचणी उड्डाण यशस्वी केले. चीनमधील शानडोंग प्रांतातून झालेल्या या उड्डाणात दोन वैमानिक आणि एक अभियंता सहभागी होते. या विमानाने १६ मिनिटे ३८ सेकंद हवेत राहून ६०.४ किलोमीटर अंतर पार केले.
या इलेक्ट्रिक विमानात पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या इंजिनऐवजी पंखांवर बसवलेले १० इलेक्ट्रिक फॅन वापरण्यात आले आहेत. हे विमान एकावेळी १९ प्रवाशांना घेऊन उड्डाण करू शकते. त्याचा कमाल वेग ताशी ३०० किलोमीटर असून नियोजित प्रवास क्षमता ४०० किलोमीटर आहे.
भविष्यात अशा विमानांचा वापर सुरू झाल्यास कमी अंतराच्या हवाई प्रवासासाठी इंधन खर्च, ध्वनिप्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होऊ शकते
Pune City, Pune | Nov 16, 2026