*सिंहगड इन्स्टिट्यूटला पुन्हा मोठा धक्का! २९५ कोटींचा मिळकतकर थकीत; पुणे महापालिकेच्या कारवाईची तयारी*
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेचा तब्बल २९५ कोटी रुपयांचा मिळकतकर थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी पुणे महापालिकेकडून संस्थेच्या एकूण ३३ मिळकतींवर कायदेशीर बोजा नोंदविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रस्तावानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवून थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गरज पडल्यास संबंधित मिळकतींचा लिलाव करून थकबाकी वसूल करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
ED आणि CBI च्या तपासाच्या पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिकेच्या संभाव्य कारवाईमुळे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढणार का? २९५ कोटींच्या थकबाकीप्रकरणी महापालिका नेमकी कोणती पावले उचलणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
Sinhgad Institute News, Sinhgad Institute Propert
Pune City, Pune | Nov 16, 2026