*डिजिटल व्यवहार वाढले, पण सायबर फसवणुकीचा धोका कायम; एका क्लिकमध्ये बँक खाते होऊ शकते रिकामे!*
डिजिटल व्यवहारांचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना ऑनलाइन फसवणुकीचा धोकाही कायम आहे. बनावट लिंक, खोटे ग्राहक सेवा क्रमांक, बनावट गुंतवणूक योजना आणि OTP च्या माध्यमातून सायबर गुन्हेगार नागरिकांना लक्ष्य करत आहेत. विशेष म्हणजे, केवळ तंत्रज्ञानाची कमी माहिती असलेले नागरिकच नव्हे, तर सुशिक्षित आणि नियमित डिजिटल व्यवहार करणारे लोकही अशा फसवणुकीला बळी पडत आहेत.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा – UPI द्वारे पैसे प्राप्त करण्यासाठी UPI PIN टाकण्याची आवश्यकता नसते. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, OTP किंवा बँकिंगची गोपनीय माहिती कोणालाही सांगू नका आणि ग्राहक सेवा क्रमांक अधिकृत संकेतस्थळावरूनच तपासा.
डिजिटल व्यवहार बंद करणे हा उपाय नाही, तर सुरक्षित आणि जागरूकपणे व्यवहार करणे गरजेचे आहे. तुमची मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवण्यास
Pune City, Pune | Nov 16, 2026