रामटेक: रामटेकच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड
Ramtek, Nagpur | Sep 24, 2026 चंद्रपूर येथील क्रीडा संकुल मध्ये 24 सप्टेंबरला झालेल्या शालेय विभागीय स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या रामटेकच्या ईशान नारनवरे, वंशीका रहाटे व वैदही टेकाम यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत पदके पटकावली. आता त्यांची राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.