नागपूर शहर: पारडी पोलिसांची तत्परता; अवघ्या दोन तासांत सापडली ९ वर्षीय मुलगी! : नंदा मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पारडी
पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 10 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार भवानीनगर परिसरातील ९ वर्षीय मुलगी आई-वडिलांच्या रागामुळे घर सोडून निघून गेली होती. याप्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात तात्काळ अपहरणाची नोंद करत पोलिसांनी बीट मार्शल व गस्ती पथकांच्या विविध टीम तयार केल्या.सीसीटीव्ही फुटेज आणि परिसराचा कसून शोध घेत पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच एका मंदिरा जवळ सदर मुलीला सुखरूप शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्