कांद्री चेक पोस्ट येथे ट्रकचालकांचा राडा ; ट्रक चालक उतरले रस्त्यावर ; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
Ramtek, Nagpur | Nov 17, 2026 वजन काट्यावर ट्रक न नेता तो पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकाला चौकीदाराने रोखण्याचा प्रयत्न केला. यावरून उफाळलेल्या वादाने राडा झाला व यात चौकीदाराने मारहाण केल्याचा आरोप करीत या महामार्गावर धावणाऱ्या ट्रकचालकांनी ट्रक उभे करून रास्ता रोको आंदोलन पुकारले. यातून वाद वाढला व वाहतूक ठप्प झाली. यामुळे रामटेक पोलिसांसह देवलापर व पारशिवनीचे पोलिसांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली. स्थिती अनियंत्रित होऊ लागल्याने सौम्य लाठी चार्ज केल्याचे कळते. ही घटना सोमवार दिनांक 16 नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता च्या दरम्यान कांद्री चेक पोस्ट येथे घडली.