लखनऊमध्ये भीषण अपघात! डंपर आणि ट्रकच्या मध्ये कार चिरडली; तरुणीचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. मोहनलालगंज येथे गुरुवारी रात्री लग्नसमारंभातून परतणारी CNG कार डंपर आणि ट्रकच्या मध्ये अडकून पूर्णपणे चिरडली गेली.
या दुर्घटनेत २० वर्षीय समीक्षा सिंह हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिच्या आईसह चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर कारमधून मृतदेह बाहेर काढला. जखमींना ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
#LucknowAccident #RoadAccident #UttarPradeshNews #BreakingNews #TimesOfMaharashtraNews