संभलमध्ये सनातन पदयात्रा पोलिसांनी रोखली; बॅरिकेड्स तोडत आंदोलकांची पोलिसांशी धक्काबुक्की!
संभल (उत्तर प्रदेश) : हरिहर मंदिर-जामा मशिदीशी संबंधित न्यायालयीन याचिकेला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेली सनातन पदयात्रा पोलिसांनी रोखली. प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली असतानाही पदयात्रेतील सहभागी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते.
यावेळी काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
हरिहर मंदिर-जामा मशिदीचा वाद सध्या न्यायालयात विचाराधीन असताना रस्त्यावर शक्तिप्रदर्शन करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धार्मिक श्रद्धेचा आदर राखतानाच कायद्याचे पालन आणि सामाजिक सलोखा टिकवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याची चर्चा सुरू आहे.
#Sambhal #SanatanPadyatra #UttarPradesh #PoliceAction #BreakingNews
Pune City, Pune | Nov 20, 2026