मुसळधार पावसामुळे फ्लोरिडात पूरसंकट! हॉलीवूड आणि एवेंचुरामध्ये रस्ते, घरांमध्ये शिरले पाणी
अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हॉलीवूड आणि एवेंचुरा या भागांना पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, अनेक रस्ते आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे.
ब्रॉवर्ड काउंटीच्या काही भागांत अवघ्या २४ तासांत तब्बल १५ इंचांपर्यंत पावसाची नोंद झाली. हॉलीवूडमध्ये रस्त्यांवर पाणी साचले असून, तळमजल्यावरील अपार्टमेंटमध्येही पुराचे पाणी शिरले. त्यामुळे शेकडो वाहनचालक अडकले. तर एवेंचुरा येथे पुराचे पाणी कारच्या इंजिनपर्यंत पोहोचल्याने मुख्य रस्त्यांवर अनेक वाहने बंद पडली.
#FloridaFloods #HeavyRainfall #HollywoodFlorida #Aventura #USAWeather
Pune City, Pune | Nov 20, 2026