रामटेक: कृष्ण जन्माष्टमी निमित्त रामटेक शहरात कान्हाच्या आगमनाची धूम
Ramtek, Nagpur | Sep 4, 2026 रामटेक शहरात 4 सप्टेंबरला सकाळपासूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह दिसून येत आहे.आपल्या लाडक्या कान्हाच्या मूर्तीला आपल्या घरी आणून तिची स्थापना करण्यासाठी श्रीकृष्ण भक्त भाविकांची लगबग दिसत आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पासून भाविक रामटेक शहरातील शनिवारी वार्ड कुंभारपुऱ्यात मूर्ति विक्री दुकानात तसेच मूर्ती विकणाऱ्यांच्या घरी जाऊन आपल्या आवडीची मूर्ती खरेदी करून घेत आहेत.