भिवापूर: भिवापूर-चिखली रोडची दुरवस्था; नागरिक त्रस्त,रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
भिवापूर तालुक्यातील भिवापूर-चिखली रोडची सध्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांसह शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गाचा वापर दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून केला जातो. मात्र रस्त्याची अवस्था खराब असल्यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे.