कामधंदा नको, नशेची हौस अन् ऐशोआरामाची जिंदगी! लोकलमधील गर्दीचा घेतला चोरीसाठी फायदा; इगतपुरीच्या सराईत चोरट्याला कोपरमध्ये बेड्या!
प्रवाशांचे मोबाईल, बॅगा आणि पर्सवर मारायचा डल्ला; डोंबिवली रेल्वे पोलिसांची कारवाई, दोन चोरीचे मोबाईल जप्त
डोंबिवली : कामधंदा न करता नशेची हौस भागवायची आणि ऐशोआरामात आयुष्य जगायचे, या हव्यासापोटी एका सराईत चोरट्याने चोरीचा मार्ग निवडल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण ते ठाणे दरम्यान धावणाऱ्या लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत हा चोरटा मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत होता.
सकाळी आणि संध्याकाळी लोकलमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत तो प्रवाशांचे मोबाईल, बॅगा आणि पर्स चोरी करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, इगतपुरी येथील या सराईत चोरट्याने चोरीसाठी लोकलमधील गर्दीला लक्ष्य केले होते.
या चोरीच्या घटनांचा तपास करत असताना डोंबिवली रेल्वे पोलिसांनी सापळा रचून कोपर रेल्वे स्था
Kalyan, Thane | Nov 16, 2026