कामठी: कामठी येथे पालकमंत्री यांचा गृहभेट दौरा संपन्न: नागरिकांच्या समस्या जाणून घेत योग्य कार्यवाहीचे आश्वासन
Kamptee, Nagpur | Aug 16, 2026 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृहभेट दौऱ्यादरम्यान नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील नया गोदाम परिसरात सौ. अश्विनीताई संतापे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी परिसरातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनी सादर केलेली निवेदने स्वीकारून त्यांच्या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधितांशी समन्वय साधण्याचे आश्वासन दिले.