रामटेक: रामटेक येथे एटीएम कार्ड अदलाबदली करून आर्थिक फसवणूक करणारा आरोपी दीड महिन्यानंतर जेरबंद
Ramtek, Nagpur | Oct 2, 2026 किसान चौक रामटेक येथे एटीएम कार्डची अदलाबदली करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या एक आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून फसवणुकीच्या रकमेसह एक मोबाईल असा एकूण 34000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती रामटेक पोलिसांनी दोन ऑक्टोबरला सकाळी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद अमीर मोहम्मद बशीर वय 44 वर्षे याला मु बाबरी शामली उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली.