नागपूर शहर: नागपूरमध्ये तान्हा पोळ्याचा उत्साह: लक्षावधी रुपयांचे लाकडी नंदीबैल बाजारात!
विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांसाठी साजरा होणाऱ्या 'तान्हा पोळा' या सणाला यंदा २३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन १७८९ मध्ये राजे रघुजी महाराज भोसले यांनी ही परंपरा सुरू केली होती. नागपूरच्या लकडगंज परिसरातील लकडा बाजारात लाकडी नंदीबैलांची खरेदी करण्यासाठी पालकांची व बालगागोपाळांची मोठी गर्दी जमली आहे.बाजारात ६ इंचांपासून ते तब्बल ७-८ फूट उंचीचे नंदीबैल उपलब्ध असून, त्यांची किंमत १०० रुपयांपासून ते तब्बल ८ लाख रुपयांपर्यंत आहे. वर्धा जिल्ह्यातील कारागीर रवींद्र मुकादम यांनी तय