रामटेक: क्रीडा प्रशिक्षक अजय खेडगरकर यांचे मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार प्राप्तीनंतर रामटेक येथे भव्य स्वागत
Ramtek, Nagpur | Sep 3, 2026 क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून तालुका ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रामटेक येथील क्रीडा प्रशिक्षक अजय खेडगरकर यांना नुकताच सातारा येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन टाउन हॉल येथे मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराप्राप्तीनंतर रामटेक शहरात त्यांचे आगमना निमित्य रामटेक शहरात भव्य स्वागत सत्कार करण्यात येऊन स्वागत रॅली काढण्यात आली.