रामटेक: एसआयआर नंतरही रामटेक विधानसभा क्षेत्रात 1322 दुबार मतदारांची नावे ; काँग्रेसची पत्रपरिषदेत चौकशीची मागणी
Ramtek, Nagpur | Sep 24, 2026 रामटेक लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस खासदार श्याम कुमार बर्वे यांनी एसआयआर 2026 अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील कथित त्रुटींवर पत्रकार परिषदेत आक्षेप नोंदविला आहे.त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रामटेक विधानसभा मतदारसंघात 1322 दुबार नोंदी असल्याचे आढळले आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.