सदावर्तेंच्या टीकेला सोनाळेंचे प्रत्युत्तर; शिंदेंच्या समर्थनार्थ संतप्त व्हिडिओ व्हायरल
उदगीर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्याला उत्तर म्हणून लातूर जिल्हा उपप्रमुख, कट्टर शिवसैनिक आणि माजी सैनिक श्रीमंत दादा सोनाळे यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
व्हिडिओमध्ये सोनाळे यांनी स्वतःची ओळख बाळासाहेब ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक राहिलेले, शौर्य पदक प्राप्त माजी सैनिक आणि सध्या शिवसेना (शिंदे गट) उदगीर तालुका / लातूर जिल्हा उपप्रमुख अशी करून दिली आहे.
काय म्हणाले सोनाळे?एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. लाडकी बहीण योजना, दुष्काळात धान्य वाटप यांसारख्या कामांमुळे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वाढवली, असा दावा सोनाळे यांनी केला. शिंदे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्ते दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना मिळालेले पोलीस संरक्षण काढून घ्यावे, अशी मागणीही सोनाळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. आपण लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील रहिवासी असून, कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, शिवसैनिकांमध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
--------------------
#EknathShinde #GunratnaSadavarte #ShrimantSonale #Shivsena #LaturNews #Udgir #MaharashtraPolitics #BreakingNews #MarathiNews #PrimeLiveNews
:#Latur #Udgir #LaturNews #UdgirNews #EknathShinde #Shivsena #Shivsainik #GunratnaSadavarte #ShrimantDadaSonale #MajiSainik #MaharashtraPolitics #MaharashtraNews #लातूर #उदगीर #एकनाथशिंदे #शिवसेना #गुणरत्नसदावर्ते #श्रीमंतसोनाळे #महाराष्ट्रराजकारण #मराठीबातमी
Latur, Latur | Nov 4, 2026