Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Latur
Ahmednagar
Akola
Amravati
Chhatrapati Sambhajinagar
Beed
Bhandara
Buldhana
Chandrapur
Dhule
Gadchiroli
Gondia
Hingoli
Jalgaon
Jalna
Kolhapur
Latur
Mumbai City
Mumbai suburban
Nanded
Nandurbar
Nagpur
Nashik
Dharavshiv
Palghar
Parbhani
Pune
Raigad
Ratnagiri
Sangli
Satara
Sindhudurg
Solapur
Thane
Wardha
Washim
Yavatmal
Latur
Ahmadpur
Latur
Nilanga
Jalkot
Udgir
Shirur Anantpal
Ausa
Chakur
Deoni
Renapur
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
←
News in Latur
📍मानपातील सत्ताधारी काँग्रेस चा आज भाजपा आणि राष्ट्रवादी ने निषेध करत केले जोरदार आंदोलन.
Latur, Latur | Aug 6, 2026
लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. सभागृहात शहराच्या विकासाशी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी येतील, अशी अपेक्षा असताना, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार आंदोलन छेडले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा आरोप आहे की, सभेच्या अजेंड्यातील 1 ते 28 क्रमांकापर्यंतच्या विषयांवर कोणतीही सविस्तर चर्चा न करता ते घाईघाईने मंजूर करण्यात आले. अवघ्या काही मिनिटांतच सभा गुंडाळून महापौर सभागृहातून निघून गेल्याचा आरोपही करण्यात आला. विरोधी पक्षाच्या म्हणण्यानुसार, लातूर शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि इतर मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक असताना त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षांचा अवमान झाल्याची भावना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी व्यक्त केली. याशिवाय, माजी केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या विषयालाही सभागृहात चर्चेसाठी न आणल्याबद्दल विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लातूरच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महत्वाच्या नेत्याच्या विषयावर चर्चा न होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले. याच सर्व गोष्टींचा निषेध करत आज लातूर गांधी चौक येथे भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन केले यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर मनपामध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा आणि महापौर तसेच लातूर शहराच्या आमदार अमित देशमुख यांचा आज जाहीर निषेध नोंदवला आहे.
Latur, Latur | Aug 6, 2026
📍 लातूरकरांनो आपलं मत मांडा. #folowers #facebookvideo
Latur, Latur | Aug 5, 2026
Nearby Cities
AH
Ahmadpur
LA
Latur
NI
Nilanga
JA
Jalkot
UD
Udgir
SA
Shirur Anantpal
AU
Ausa
CH
Chakur
DE
Deoni
RE
Renapur
Kanda Lasun Chutney Recipe in Marathi | Spicy Maharashtrian Chutney | Dry Garlic Chutney
Latur, Latur | Aug 5, 2026
लातूर महानगरपालिकेतल्या सर्वसाधारण सभेविषयी महत्त्वाच्या विषयावर लातूर शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची पत्रकार परिषद.
Latur, Latur | Aug 5, 2026
लातूर करांनो हे पत्रकारांनी दाखवू नये म्हणुन व्हिडीओ करण्यासाठी सभागृहात बंदी घालण्यात आली
Latur, Latur | Aug 5, 2026
लातूर महापालिकेत भाजपा काँग्रेस आमने सामने
Latur, Latur | Aug 5, 2026
📍लातूर महानगर पालिकेच्या उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेत लातूरकरांचे हित कुठेही दिसत नाही अशा सर्वसाधारण सभेचा अजित पाटील कव्हेकर यांनी केला जाहीर निषेध.
Latur, Latur | Aug 4, 2026
📍लातूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसरात वाचनालयाच्या मागणीसाठी प्रतीकात्मक आंदोलन 📍लातूर महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसरात "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय व सभागृह" उभारण्याच्या मागणीसाठी समाजबांधवांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौर व सभागृह नेते, स्थायी समिती सभापती हे लोकप्रतिनिधी चार तास प्रतीक्षा करूनही उपस्थित न राहिल्याने मातंग समाजाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर आंदोलकांनी महापौरांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देत प्रतीकात्मक निषेध नोंदवला. पूर्वी दिलेले आश्वासन कायम ठेवून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने वाचनालय व सभागृह उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, तसेच समाजाच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली. मातंग समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष झाल्यास संविधानाच्या चौकटीत राहून व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Latur, Latur | Aug 4, 2026