रोहा: मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग पाच तास ठप्प
Roha, Raigad | Jul 7, 2026 रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात गेली तीन चार दिवस मुसळधार पावसाने झोडपले असून दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस सगळीकडे पडत आहे. त्यातच मुंबई गोवा महामार्ग लगत सुकेळी खिंड आणि मोठा डोंगर घाट मा-थ्यावर सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी वाढली असून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.