आज सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर म्हसळा, गोरेगाव, महाड आणि मंडणगड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीदरम्यान, उपस्थितांना संघटन मजबूत करणे, बूथ पातळीवरील तयारी, मतदारांशी थेट संपर्क तसेच, निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या राजकीय रणनितीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.