कळमेश्वर: धापेवाडा येथे टेक्स्टाईल उद्योगाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
आज धापेवाडा येथे टेक्स्टाईल उद्योगाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि हँडलूम उद्योगाचा उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी माननीय खासदार हेमा मालिनी जी आणि केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांच्यासह उपस्थित राहून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. वस्त्रोद्योग आणि हातमाग क्षेत्राला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगारनिर्मिती, कारागिरांच्या कौशल्याला प्रोत्साहन आणि विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे.