रामटेक: नगरधन येथील राईस मिल परिसरातील तलावात बुडालेल्या तिसऱ्या मजुराचे शव मिळाले
Ramtek, Nagpur | Sep 27, 2026 रामटेक - मौदा महामार्गावरील नगरधन येथील ओमकारा राईस मिलच्या तीन मजुरांचा शनिवार दि. 26 सप्टेंबरला दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास आंघोळीला गेले असता परिसरातील शेततलावात बुडून अंत झाला होता. यापैकी शनिवारला सायंकाळपर्यंत गुलशन कुमार व रुपेश कुमार यांचेच शव बाहेर काढण्यात आले होते. मात्र मनीष कुमार याचे शव सापडले नव्हते. रविवारला सकाळपासून प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी पावणे पाच वाजताच्या दरम्यान त्याचेही हाती लागले.