नागपूर शहर: गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून घरफोडीचा आरोपी जेरबंद; चांदीचे दागिने हस्तगत
10 सप्टेंबरला सकाळी 11:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने गिट्टीखदान पोलीस ठाण्याकडील घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेण्यास यश मिळवले आहे.दयाशंकर ऊर्फ सागर संतोष बघेल असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.अंदाजे १६,००० रुपये किमतीचे चांदीचे दागिने आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे. गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कपिलनगर हद्दीतून आरोपीला पकडले. अंगझडतीत चोरीचा मुद्देमाल मिळाल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला