कुडाळ: सिंधुदुर्गमध्ये लोकसहभागातून जलसंधारणावर जोर
सिंधुदुर्गमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नितेश राणे यांनी जलसंधारणासाठी लोकसहभागाने कामे तीव्र गतीने राबवावीत असं आवाहन केलंय. पाणी बचतीसाठी ग्रामपंचायती, स्थानिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम करावं, वनराई बंधारे उभारावेत, पावसाचे पाणी जतन करावं, तर VB-GRAM-G योजनेअंतर्गत योजना प्राधान्याने अमलात आणाव्या. प्रशासकीय विभागांनी नियमित आढावा घेऊन कामांची योग्य कारवाई करावी, अशी सूचना दिली आहे.