कुडाळ: सिंधुदुर्गमध्ये दुष्काळानंतर शेतीचे पंचनामे सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कुडाळ तालुक्यातील पोखरण-कुसबे गावांमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी यांचा सहभाग आहे.