रामटेक: अपघातानंतर पोलीस बंदोबस्तासाठी चक्रधर स्वामी मंदिर मनसर समोर दीड तास चक्काजाम आंदोलन
Ramtek, Nagpur | Aug 8, 2025 रामटेक - मनसर मार्गावरील चक्रधर स्वामी मंदिर मनसर समोर शुक्रवार दि. 8 ऑगस्टला सायं. 4.30 वाजताचे दरम्यान मंचर कडून मनसर माईन कडे रेती भरून जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 36 1889 ने रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचाऱ्याला धडक दिली. यात गरीब पादचारी केशव सिताराम कोडापे वय 32 वर्षे रा. रामटेक हा जबर जख्मी झाला. यानंतर लगेच या ठिकाणी जमलेल्या संतप्त गर्दीने माजी जि. प. सदस्य सतीश डोंगरे,सरपंच कैलास नरुले, समाजसेवी रॉकी चवरे यांचे नेतृत्वात मनसर - रामटेक रोडवरच घटनास्थळी ठिय्या मांडला.