कळमेश्वर: काटोल–नागपूर मार्गावर मातीच्या ढिगाऱ्यामुळे कार पलटी; 3 जण जखमी
काटोलहून नागपूरच्या दिशेने जात असलेली MH 45 N 7218 क्रमांकाची Volkswagen कार घोराट टप्पा, काटोल रोड येथे रस्त्यावर पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे पलटी झाल्याची घटना घडली. या कारमध्ये सुदेश शेंडे, अलका शेंडे, रोशन शिंदे, खुशी रोशन शेंडे आणि अर्णव कावडकर हे प्रवास करत होते. अपघातात त्यांना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.