छञपती शिवाजी महाराज चौकात दररोज ट्राफिक जाम
उदगीर : उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोजच वाहतुकीचा खोळंबा दिसून येत आहे.
विशेषतः संध्याकाळच्या वेळेस बेशिस्त ऑटो चालक, मोटर सायकल चालक तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे अवजड वाहने, एसटी बस यांना चौकातून फिरताना मोठी कसरत करावी लागत आहे.
तसेच रस्त्यावरील हातगाडे, भाजीपाले वाले यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे
यातच बस स्टॅन्ड समोरील हातगाडे तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक यामुळे हि वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.
*हॅशटॅग :
#Udgir #UdgirNews #ShivajiMaharajChowk #UdgirTraffic #TrafficJam #BusStand #IllegalTransport #Auto #STBus #Latur #PrimeLiveNews #BreakingNews
Latur, Latur | Nov 12, 2026