नागपूर शहर: उपराजधानी हादरली! नागपूरमध्ये तान्हां पोला सणाच्या दिवशी पतीनेच केली पत्नीची हत्या: हरेश काळसेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 11 सप्टेंबर ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार नागपूरमधील मानकापुर पोलीस ठाण्यांतर्गत गोधनी परिसरात तान्हां पोला सणाच्या दिवशी एका पतीने कौटुंबिक वादातून पत्नीची कुल्हाडीने वार करून हत्या केली. सविता शिवकुमार वरकडे असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी पती शिवकुमार रमेश वरकडे याला पोलिसांनी अटक केली आहे. सकाळी दोघांमध्ये झालेल्या वादानंतर संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात आणि पाठीवर कुल्हाडीने वार केले. गंभीर जखमी महिलेला मेयो रुग्णालयात दाखल.