शासनाच्या विरोधात रामटेक न्यायालयासमोर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू
Ramtek, Nagpur | Nov 17, 2026 नागपूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना नागपूरच्या निर्देशानुसार रामटेक येथील न्यायालयासमोर शासनाच्या विरोधात येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपला सुरुवात केली आहे. मंगळवार दिनांक 17 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता पासून येथील कर्मचारी संपावर बसले असून कामकाज ठप्प झाले आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा प्रलंबित सुधारित वेतन प्रस्ताव त्वरित मंजूर करावा ही संपकऱ्यांची मुख्य मागणी आहे.