रामटेक: कांद्री वस्ती येथे टायर फुटल्याने लक्झरी बसला अपघात; कुठलीही हानी नाही
Ramtek, Nagpur | Oct 1, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कांद्री वस्ती शिवारात गुरुवार दिनांक 1 ऑक्टोंबर च्या पहाटे पाच वाजताच्या दरम्यान दिंडोरी वरून नागपूरकडे येणाऱ्या एका लक्झरी बसचा समोरचा टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात कुठलीही हानी झालेली नाही.