कळमेश्वर: कळमेश्वर-काटोल मार्गावर दुचाकीचा अपघात; देवांश फाउंडेशनची जखमीला तातडीने मदत
कळमेश्वर-काटोल मार्गावर दुचाकीचा अपघात; देवांश फाउंडेशनची जखमीला तातडीने मदत,कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कळमेश्वर-काटोल रोडवरील रिजेंट शाळेजवळ दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघाताची घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या युवकाला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी देवांश फाउंडेशनच्या ॲम्बुलन्स टीमने तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील जखमी युवकाचे नाव अनुप अरुण भगत (वय २८ वर्षे), रा. सोनपूर, आदासा असे आहे.