फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतचे संगणक परिचालक आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी
फुलंब्री तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीचे संगणक परिचलकांनी मुंबई येथे सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनात सहभाग नोंदविला होता. विविध प्रलंबित मागण्यासाठी सदरील आंदोलन सुरू होते. मात्र सकारात्मक प्रतिसादना मिळाल्याने पोलिसांनी सायंकाळी सहा वाजता जबरदस्ती आंदोलन करताना उठविले. मात्र त्यानंतर सीएसटी स्थानकामध्ये या आंदोलन कर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.