नागपूर शहर: एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक, फरार आरोपी शोध सुरु : जयवंत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी 9 सप्टेंबर ला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार,पेट्रोलिंग दरम्यान इमामवाडा पोलिसांनी एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीच्या फरार साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे. याबद्दलची अधिक माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे.