रामटेक: आमडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन; मृत्युंजय दूत पंकज चौधरी च्या धाडसाचे पोलीस अधीक्षकांकडून कौतुक.
Ramtek, Nagpur | Sep 22, 2026 महामार्गावर प्रवाशांना तातडीची मदत मिळावी तसेच अपघाताच्या घटनांमध्ये जखमींना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने आमडी येथे महामार्ग पोलीस मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली.22 सप्टेंबरला महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. लोहित मतानी यांच्या हस्ते मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अपघातग्रस्तांना वेळेत मदत पोहोविणाऱ्या मृत्युंजय दूत तथा पत्रकार पंकज चौधरी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांना गौरविण्यात आले.