नरखेड: नरखेड तालुक्यात मोठी कारवाई: दोन सराईत गुन्हेगार २ महिन्यांसाठी तडीपार
Narkhed, Nagpur | Aug 23, 2026 तडीपार करण्यात आलेले आरोपीमध्ये रोहित विकी खोब्रगडे आणि अनिल महादेव गोंडाने यांचा समावेश आहे. आरोपींच्या सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने उपविभागीय दंडाधिकारी, काटोल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.दोन्ही आरोपींना नागपूर जिल्ह्यातून २ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.हे आरोपी नागपूर ग्रामीण किंवा जिल्हा हद्दीत दिसून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन नागपूर ग्रामीण पोलिसांनी केले आहे