नागपूर शहर: थरारक! सक्करदरा येथे एसबीआय बँकेत ४ लाख ५३ हजारांची सनसनाटी लूट; बीएससी पदवीधर तरुण काही मिनिटांतच जेरबंद!
सक्करदरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भांडे प्लॉट परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी सायंकाळी एक मोठी खळबळजनक घटना घडली. एका तरुणाने बँकेत घुसून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि कॅश काउंटरवरून तब्बल ४ लाख ५३ हजार रुपये लुटून पळ काढला. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही मिनिटांतच आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्याच्याकडून संपूर्ण जप्त केलेली रक्कम देखील हस्तगत करण्यात आली आहे