रामटेक: शिक्षक दिनानिमित्त रामटेक येथे फ्रेंड्स फोरेवर महिला ग्रूप ने केला शिक्षकांचा सत्कार
Ramtek, Nagpur | Sep 5, 2026 शिक्षक दिनाचे औचित्य साधत शनिवार दि. पाच सप्टेंबरला दुपारी स्व.घनश्यामराव किंमतकर स्मृती सभागृह रामटेक येथे शिक्षक शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. फ्रेंड्स फोरेवर महिला ग्रुप रामटेक च्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.