कुडाळ: सिंधुदुर्गमध्ये पाणीटंचाई टाळण्यासाठी 10 हजार बंधारे बांधण्याचा उपक्रम सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा इशारा मिळाल्यानंतर प्रशासनाने जलसंधारणासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. कुडाळ तालुक्यातील अणाव गावातून 10 हजाराहून अधिक बंधारे उभारण्याची मोहिम सुरू झाली असून पुढील १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट आहे.