रामटेक: लैंगिक शोषणातील फरार आरोपी शिपाई अजय याला चंद्रपुरातून अटक
Ramtek, Nagpur | Sep 6, 2026 रामटेक येथील एका महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी प्रकरणी फरार असलेला आरोपी अजय सलामे वय 38 वर्षे रा. छोरीया लेआउट रामटेक याला रामटेक पोलिसांनी दिनांक 5 सप्टेंबरला चंद्रपूरातून अटक केली आहे. मध्यरात्री रामटेक पोलीस स्टेशन येथे आणण्यात आल्यानंतर रविवार 6 सप्टेंबरला त्याला रामटेकच्या न्यायालयात हजर केले असता त्याला आगामी तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.