काटोल: अबरेशिया मेट्रोपार्कच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून बालकाचा मृत्यू; मालक व व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Katol, Nagpur | Aug 16, 2026 स्वातंत्र्यदिनी काटोल तालुक्यातील अबरेशिया मेट्रोपार्क येथे फिरायला गेलेल्या ७ वर्षांच्या अभिनंदन दुर्जनलाल नागरवाड या बालकाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला.स्विमिंग पूलच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक असलेला लाईफ गार्ड आणि इतर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. मृत बालकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अबरेशिया मेट्रोपार्कचे मालक नरेश गणपतराव पवनीकर आणि व्यवस्थापक सुनील वसंतराव भोयर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.